शेतीसाठी त्यांनी आयपीएसची नोकरी नाकारली! भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं मनाशी ठरवलं अन केलंही तसंच !

भूषण श्रीखंडे
Thursday, 6 August 2020

बंगालमधील भूकबळीच्या घटनांमुळं ते खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हाच त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं मनाशी ठरवलं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण केलं.

जळगाव ः भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील विविध क्षेत्रात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. देशातील कृषी क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल करत नविन वाण निर्मीत करून भारतील शेती व्यवसायाचा चेहरा मोहरा बदलण्याचे मोलाचे काम स्वामिनाथन यांनी केले. त्याच्या कार्याबद्दल त्यांना भारताचे हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. 

स्वामिनाथ यांचा जन्म तामिळनाडूमधील कुंभकोणम् येथे झाला.. तेथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी त्रावणकोर विद्यापीठातून आत्ताचे केरळ विद्यापीठ बी.एससी. (प्राणिशास्त्र, १९४४) व मद्रास विद्यापीठातून बी.एस्सी.( कृषी, १९४७) या पदव्या मिळविल्या. तसेच त्यांना आनुवंशिकीमध्ये बटाट्यावर संशोधन केल्याबद्दल केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. (१९५२) ही पदवी मिळाली. 

बटाट्यावरील संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल 
१९५२ मध्येच त्यांची अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात संशोधकपदी नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी बटाट्यावरील अजून संशोधन सुरू ठेवत बटाट्याचा सोलॅनम ट्युबरोजम या जातीच्या मूळ ठिकाणाचा शोध लागला. या संशोधनावर त्यांनी सादर केलेला शोधनिबंधाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली. स्वामिनाथन यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या शेती विषयी अनेक पुस्तके देखील लिहिली. 

अन् स्वामिनाथन भारतात परतले
आनुवंशिकी शास्त्रातील आपल्या संशोधनाचा उपयोग भारतातील अन्न समस्या सोडविण्यासाठी व्हावा, असे स्वामिनाथन यांना वाटत होते. त्यांनी निर्धार केला आणी इसवी सन १९५४ मध्ये भारतात ते परतले. परतल्यावर स्वामिनाथन् यांची कटक येथील केंद्रीय भात संशोधन केंद्रात वनस्पतिशास्त्रज्ञ या पदावर काम पाहिले. वर्षभरातच स्वामिनाथन यांना दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत गहू संशोधनाची जबाबदारी दिली. १९६६ मध्ये ते भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून रुजू झाले. 

आयपीएसची नोकरी नाकारली!
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून नोकरीची ऑफर आली होती. मात्र, ती न स्वीकारता ते नेदरलँडला शेतीविषयक अभ्यासासाठी गेले. बंगालमधील भूकबळीच्या घटनांमुळं ते खूप अस्वस्थ झाले होते. तेव्हाच त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं मनाशी ठरवलं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण केलं.

शेतीतच सुरू केली प्रयोगशाळा
संचालक पदाचे काम सुरू असतांना त्यांनी शेतीच आपली प्रयोगशाळा सुरू करत शेतकऱ्यांसोबत शेतात कामकरतांना समस्या, पारंपारीक पद्धतीचा अभ्यास केला. गव्हाचे उत्पादन वाढविणे ही जगभरातील सर्व राष्ट्रांची समस्या होती. त्यानुसार स्वामिनाथन यांनी गव्हाच्या सुधारित वाणाच्या निर्मिती सुरू केली. प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन अर्नेस्टबोर्लॉग यांना स्वामिनाथन यांनी भारतीय शेतीची पाहणी करण्यासाठी बोलावले. बोलॉँग यांनी भारतीय शेतीची पाहणी करून त्यांनी रोपांची निवड व वर्गीकरणाचा सल्ला दिला. त्यानंतर संशोधनातून नवीन गव्हाच्या संकरित जाती शोधल्या. यामध्ये मालविका, सरबती सोनोरा, सोनेरी वर्णाचा दाणा असलेल्या कसदार गव्हाचा नवीन वाण तयार केली. तसेच भाताची पुसा २-२१ आणि बासमती यांच्या संकरातून साबरमती हा वाण शोधली. विविध संशोधनातून ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कपाशी, भुईमूग व बटाटा, द्राक्षे, सफरचंद, केळी, आंबा, पपई, पेरू व चिकू अशाचे उत्पादन वाढले. 

विविध समित्यांमध्ये त्यांचा सहभाग 
स्वामिनाथन् यांना १९७० नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक राष्ट्रीय समित्यांवर सल्लागार म्हणून नेमले. त्यात राष्ट्रीय शेती आयोगावर सदस्य, दारिद्य्र निर्मूलन प्रकल्पासाठीच्या तज्ञ समितीमध्ये तसेच अंधत्व निवारण, कुष्ठरोग निर्मूलन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात स्थापन झालेल्या ‘नॅशनल कमिशन ऑन फार्मर’ या राष्ट्रीय आयोगाचे ते अध्यक्ष होते. (२००४-०६). पाहणीचा अहवाल व इतर अभ्यासाच्या आधारे त्यांनी भारतीय शेतीची एकूण १६ भिन्नत्वदर्शक वैशिष्ट्ये विषद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon India's green revolution swaminathan success story of agriculture field