'आभारी' आहे नितीश ; लालूंच्या शिक्षेनंतर तेजस्वींची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
रविवार, 7 जानेवारी 2018

''लालूंच्या शिक्षेमुळे आमच्या पक्षाला कोणतीही हानी पोचणार नाही. लालू तळागाळातील लोकांना घेऊन चालत आहेत. केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे आणि हे कारस्थान मी तोडणार आहे. मात्र, आता योग्यवेळी आम्ही याला प्रत्युत्तर देऊ. ही वेळ आमच्यासाठी स्पर्धात्मक आहे. मात्र आम्ही याविरोधात लढणार आहोत''

- तेजस्वी यादव

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधत त्यांचे 'आभार' मानले. 

सुमारे 950 कोटींचे पशूखाद्य गैरव्यवहार केल्याप्रकरणी न्यायालयाने लालूंना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासाठी त्यांनी नितीशकुमारांचे आभार मानले. त्यानंतर भाजप आणि सत्ताधारी संयुक्त जनता दलाकडून कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचे सांगण्यात आले.

''लालूंच्या शिक्षेमुळे आमच्या पक्षाला कोणतीही हानी पोचणार नाही. लालू तळागाळातील लोकांना घेऊन चालत आहेत. केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे आणि हे कारस्थान मी तोडणार आहे. मात्र, आता योग्यवेळी आम्ही याला प्रत्युत्तर देऊ. ही वेळ आमच्यासाठी स्पर्धात्मक आहे. मात्र आम्ही याविरोधात लढणार आहोत'', असेही तेजस्वी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national politics lalu prasad yadav in jail thank you nitish says tejaswi yadav