लोकसभा अध्यक्षांनी बोलावली संसदीय नेत्यांची बैठक

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जानेवारी 2018

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी बोलवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी बोलवण्यात आली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सताधारी भाजपला विविध मुद्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. संसदेच्या या सत्रामध्ये विविध मुद्यांवर चर्चा केली जाणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे या अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संसदेचे हे अधिवेशन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरु होणार आहे. 

या अधिवेशाचे पहिले सत्र 29 जानेवरी आणि 9 जानेवारीदरम्यान होणार आहे. यादरम्यान सरकारकडून 29 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारीच्या कालावधीनंतर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत अधिवेशन होणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News National Politics news Ahead of Budget session Lok Sabha speaker calls meeting of House leaders on Sunday