राहुल द्रविड, साईना नेहवालसह 800 जणांची फसवणूक

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

बंगळुरु - सध्या अनेक घोटोळे उघडकीला येत असतानाच विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने राहुल द्रविड, साईना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांसारख्या 800 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम इनव्हेस्टमेंट कंपनीने आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना मिळून जवळपास 300 कोटींना फसविले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीप्रकरणी कंपनीचे मालक राघवेंद्र श्रीनाथ, एजंट म्हणून काम करणारे सुतराम सुरेश, नरसिंहामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद या सगळ्यांना अटक करण्यात आली असून, या सगळ्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगळुरु येथे काम करणारे क्रीडा पत्रकार सूत्रम सुरेश यांनाही अटक करण्यात आली आहे. विक्रम इनव्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवावेत यासाठी सूत्रम सुरेशने प्रकाश पदुकोण, राहुल द्रविड आणि साईना नेहवाल भरिस पाडले असावे. सुरेशने सांगितलेल्या गुंतवणुकीच्या योजनेवर विश्वास ठेवून या तिघांनी या कंपनीत पैसे गुंतवले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विक्रम इनव्हेस्टमेंट आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याचे आश्वासन दिले होते. अशा माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे.  

दरम्यान, पोलिस या कंपनीच्या बँक खात्यांची माहिती घेत आहेत. तसेच कंपनीच्या विविध कागदपत्रांचीही पाहणी केली जात आहे. फसवणूक झालेल्यांच्या यादीत खेळ, सिनेमा आणि राजकीय जगतातील अनेक व्यक्तींचा समावेश असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Rahul Dravid, Saina Nehwal prakash padukone cheated by Bengaluru firm