
राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, "त्या एक गरीब महिला आहेत आणि भाषणानंतर त्या थकल्या होत्या." दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे भाषण कंटाळवाणे असल्याचे म्हटले. आता यावरून राजकारण तापले आहे. भाजपने म्हटले आहे की सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केला आहे.