तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण - ममता बॅनर्जी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

अहमदपुर (पश्चिम बंगाल) - तिहेरी तलाक हा विषय आता सगळीकडूनच चघळला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता. 3) तिहेरी तलाकचे विधेयक दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. मुस्लिम महिलांचे या विधेयकामुळे चांगले होण्यापेक्षा जास्त नुकसान होईल, असेही त्या म्हणाल्या.    

ममता बॅनर्जी या 78 व्या इंडियन हिस्ट्री काँग्रेसच्या विशेष उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. अलीकडे लोकसभेत मंजूर केलेले मुस्लिम महिला विधेयक (विवाह संरक्षणाचे अधिकार) यासोबत भाजप राजकारण करु पाहत आहे, असा आरोप ममता यांनी केला. 

तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आम्ही नाही कारण ते स्त्रियांसाठी आहे. मी नवीन कायद्याचे पालन करणाऱ्या अनेक मुस्लिमांना ओळखते. पण हे विधेयक भाजप सरकारचे आहे, हीच एक दोषपूर्ण गोष्ट आहे. मुस्लिम महिलांचे रक्षण करण्याऐवजी त्यांना हानी पोहोचवणाऱ्या या विधेयकासह भाजप राजकारण करत आहे, असे ममता यांनी एका बैठकीत बोलताना म्हटले. सोबतच ममता यांनी दावा केला की, तृणमूल काँग्रेस हा देशातील एकमेवपक्ष आहे ज्या पक्षात 33 टक्के महिला खासदार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेवरही ममता यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार देशभरातील या योजनेसाठी केवळ 100 कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र पश्चिम बंगाल सरकार राज्यातील 'कन्याश्री' योजनेसाठी 5 हजार कोटी खर्च करत आहेत. 

लोकसभेत 28 डिसेंबरला मुस्लिम महिला विधेयक (विवाह संरक्षणाचे अधिकार) मंजूर झाले होते. ज्यात तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिद्दत ला गुन्हेगारी मानन्यात आले आहे. यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली गेली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Triple Talaq Bill is defective said Mamata Banerjee