Veteran journalist and Padma Bhushan awardee Mark Tully, known for his decades-long reporting on India and his association with the BBC, passes away at the age of 90.
esakal
देश
Mark Tully Passes Away : ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण मार्क टली यांचे निधन, ९० व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
Padma Bhushan Mark Tully : ज्येष्ठ पत्रकार व लेखक पद्मभूषण मार्क टली यांचे वयाच्या ९०व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. दीर्घकाळ आजारी असलेल्या टली यांच्यावर साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक मार्क टली यांचे रविवारी दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची पुष्टी एफसीसी साउथ एशिया आणि आयएपीसीने केली आहे. मार्क टली काही काळापासून आजारी होते आणि गेल्या आठवड्यापासून त्यांना साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी रविवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला.

