Nikhil Sosale : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी ‘आरसीबी’चे विपणन प्रमुख आणि तीन आयोजकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी गंभीर कारवाई करत न्यायालयीन कोठडी मिळवली आहे.
बंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीसीबी आणि कब्बन पार्क पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ‘आरसीबी’चे विपणन प्रमुख निखिल सोसाळे आणि अन्य चार कार्यक्रम आयोजकांना अटक केली आहे.