
रसमलाईमुळे मोडलं लग्न; भर मंडपातून परतली वरात
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्याही एका घरात मुलीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. सगळं सुरळीत सुरू होतं. दोन्ही घरचे पाहुणे प्रचंड आनंदात होते. मात्र, नवऱ्याच्या काही दारूच्या नशेत असलेल्या मित्रांमुळे हे लग्नच मोडलं. आणि लग्न मोडण्याचं कारण ठरलीये रसमलाई. (Marriage broken in Uttar Pradesh)
हेही वाचा: हिंबा जमातीच्या महिला आयुष्यात एकदाच करतात अंघोळ…
उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) संबळ जिल्ह्यातली ही घटना आहे. लग्नाची धामधूम घरात होती. वेळेवर वऱ्हाडही मंडपात दाखल झालं. वरातीचं जोरदार स्वागतही केलं. मात्र त्यानंतर नवऱ्याच्या काही मित्रांनी आणि नातेवाईकांनी गोंधळ सुरू केला. या सर्वांनी दारु पिलेली होती. हे सगळेजण वारंवार रसमलाई मागत होते. मात्र रसमलाई न मिळाल्याने या सर्वांनी गोंधळ करायला सुरूवात केली. हा वाद इतका वाढला की हे लग्नच मोडलं.
हेही वाचा: गर्लफ्रेंडशी लग्न करायचंय ? घरच्यांना कसं राजी कराल ?
वरपक्ष आणि वधूपक्षांत झालेल्या या गोंधळानंतर ४ लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही घटना १५ जून रोजी घडली. रसमलाई न मिळाल्याने शेवटी वरात नवरीला न घेताच परतली. प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर अखेर दोन्ही पक्षांत बोलाचाली झाली आणि मग उरलेलं लग्न दुसऱ्या दिवशी पार पडलं.
Web Title: Marriage Broken Due To Rasmalai In Uttarpradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..