चुलत भाऊ-बहिणीचा विवाह बेकायदा; उच्च न्यायालयाने दिला निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

 एका २१ वर्षाच्या मुलावर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल असून त्याने याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीनावर अर्ज सुनावणी करताना न्यायालयाने निकाल दिला आहे.

चंडीगड - चुलत भाऊ आणि बहिण आपापसात विवाह करु शकत नाही आणि अशा प्रकारचा विवाह बेकायदा आहे, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. लुधियानात खन्ना सिटी-२ पोलिस ठाण्यात एका २१ वर्षाच्या मुलावर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल असून त्याने याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीनावर अर्ज सुनावणी करताना न्यायालयाने निकाल दिला आहे.

या खटल्यातील आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास सरकारी वकिलाने विरोध केला असून पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात तिच्या पालकाने तक्रार केली असून आरोपी तिचा चुलतभाऊ आहे आणि त्याचे वडिल बंधू.

हे वाचा - पुन्हा 26/11 चा कट रचत होते दहशतवादी? PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

यावेळी आरोपीच्या वकिलाने न्यायधीश अरविंद सिंह संगवान यांना सांगितले की, पक्षकाराने फौजदारी रिट याचिका दाखल केली असून त्यात त्याने त्याच्याबराबेरच मुलीचे स्वातंत्र्य जपण्याची मागणी केली आहे. मात्र चुलत भाऊ आणि भाऊ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्याच्यासमवेत विवाह करण्याचा दावा देखील बेकायदा असल्याचे न्यायालयाने या वेळी सांगितले.

न्यायधीश संगवान म्हणाले, की, मुलीचे वय १८ झाल्यानंतर विवाह करण्याची तयारी बेकायदा आहे. यावेळी याचिकाकर्त्यानी युक्तिवादासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यानुसार पुढील जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage with first cousine is illegel says harayana high court