जीव गेला तरी चालेल पण तुला 'सोडणार' नाही...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

एका युवतीचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, अचानक नवऱयाचे घर सोडून ती प्रियकराच्या घरी आली आणि जीव गेला तरी चालेल पण प्रियकराला सोडणार नाही, असे म्हणत त्याच्या घराबाहेर बसल्याची घटना येथे घडली.

मुरादाबाद (उत्तर प्रदेश): एका युवतीचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु, अचानक नवऱयाचे घर सोडून ती प्रियकराच्या घरी आली आणि जीव गेला तरी चालेल पण प्रियकराला सोडणार नाही, असे म्हणत त्याच्या घराबाहेर बसल्याची घटना येथे घडली.

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...

भोजपूर परिसरात राहणाऱया युवतीचे गावातील युवकासोबत प्रेमसंबंध होते. पंरतु, युवकाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. यामुळे युवतीचे दुसऱया गावातील युवकासोबत विवाह लावून देण्यात आला होता. विवाह मोठ्या धामधुमीत झाला. सासरी गेलेल्या युवतीचे तेथे मन रमत नव्हते.

प्रियकराला शेवटचे मिठीत घेतले अन्...

नवविवाहितेने एक दिवस सासर सोडून थेट प्रियकराचे घर गाठले. प्रियकर कामानिमित्त बाहेर गेला होता. युवती प्रियकराच्या घराबाहेरच बसली. पुन्हा सासरी जायचे नसून, येथेच राहणार असल्याचे बोलू लागली. प्रियकराचे कुटुंबिय घाबरून गेले. त्यांनी प्रियकरासह तिच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. काही वेळानंतर सर्वजण घटनास्थळी जमा झाले. सर्वांनी तिची समजूत काढली. पण, ती कोणाचेही ऐकायला तयार नव्हती. अखेर पोलिसांपर्यंत प्रकरण गेले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. जीव गेला तरी चालेल पण प्रियकराला सोडणार नाही, असे बोलू लागली.

नवऱयाने बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी...

युवतीच्या कुटुंबियांना तिला घरी नेले. युवतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली. शिवाय, कुटुंबियांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. परंतु, संबंधित प्रेम प्रकरणाची चर्चा परिसरात रंगली आहे.

शिक्षिकेचे जडले आठवीच्या वर्गातील मुलावर प्रेम अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married woman left her husband and reached the lover house at moradabad