
अहमदाबदमध्ये साबरमती बुलेट ट्रेनच्या स्टेशनचं बांधकाम सुरू आहे. या स्टेशनवर आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आग सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाने दोन तासात आग आटोक्यात आणली.