Assam News : आसामच्या मळ्यात ‘माचा’ बहरला; गुवाहाटीतील लिलावात एका लॉटची तीन हजारांना विक्री

आसामच्या तिन्सुकिया जिल्ह्यातील चहा मळ्यामध्ये ‘माचा’ प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण चहाचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन घेण्यात यश आले आहे.
Matcha Flourishes in Assam Tea

Matcha Flourishes in Assam Tea

sakal

Updated on

गुवाहाटी - आसामच्या तिन्सुकिया जिल्ह्यातील चहा मळ्यामध्ये ‘माचा’ प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण चहाचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन घेण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आज ही घोषणा केली. ‘छोटा तिंगराई टी इस्टेट’मध्ये या चहाची लागवड करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या या चहाच्या लिलावामध्ये एका लॉटची तीन हजार रुपयांना विक्री करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com