Farsa Wale Baba Death in Mathura
esakal
मथुरा येथे ब्रज परिसरातील प्रसिद्ध गो-रक्षक संत चंद्रशेखर उर्फ ‘फरसा वाले बाबा’ यांचा शनिवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. ही घटना कोटवन चौकी हद्दीतील नवीपूर गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजता बाबांना गो-तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते एका मालवाहू वाहनाला थांबवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. याचदरम्यान मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.