Maulana Arshad Madani
Maulana Arshad MadaniSakal

Maulana Madani: ''इस्लाम जगातील सर्वात जुना धर्म; भारतावर पहिला हक्क मुस्लिमांचा''

नवी दिल्लीतील रामलीला मैदानावरील जमियतच्या ३४ व्या महाअधिवेशनात ते बोलत होते.

Maulana Arshad Madani On Muslim Community : जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी मोठे वक्तव्य करून पुन्हा एकदा सर्वांनाच हैराण केले आहे. ते नवी दिल्लीतील रामलीला मैदानावरील जमियतच्या ३४ व्या महाअधिवेशनात बोलत होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भारत ही भूमी मुस्लिमांची पहिली जन्मभूमी असून, इस्लाम हा बाहेरून आलेला धर्म आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे. इस्लाम हा सर्व धर्मांपैकी सर्वात जुना धर्म असून, हिंदी मुस्लिमांसाठी भारत सर्वोत्तम देश आहे.

भारतावर पहिला अधिकार मुस्लिमांचा असल्याचेही मदनी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुस्लिम संघटना भाजप आणि आरएसएसच्या विरोधात नाही परंतु त्यांच्यातील वैचारिक मतभेद कायम आहेत. हिंदुत्वाबाबतची चुकीची व्याख्या पसरवली जात असून, हिंदुत्वाचे सध्याचे स्वरूप भारताच्या आत्म्याविरुद्ध असल्याचे मदनी यांनी म्हटले आहे.

हिंदू-मुस्लिम सर्व समान आहेत. आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले. आमचा पाकिस्तानशी काहीही संबंध नसल्याचे सांगत धर्माच्या आधारावर भेदभाव होता कामा नये असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी तुर्कीमध्ये भारत सरकार करत असलेल्या कामाचे कौतुकही केले.

गेल्या काही वर्षांत मुस्लिमांविरुद्ध घटना वाढल्या आहेत. त्या घटनांवर सरकार किंवा प्रशासनाने ज्या पद्धतीने कारवाई करायला हवी होती त्या पद्धतीने ती झाली नसल्याचे मदनी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com