‘जिनांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतील; ते आमच्यासाठी निरुपयोगी’| Maulana Mahmood Madani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maulana Mahmood Madani

‘जिनांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतील; ते आमच्यासाठी निरुपयोगी’

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madani) यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी जिना यांचे नाव घेणे मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. भारतीय मुस्लिमांनी स्वातंत्र्यापूर्वीच जिनांना नाकारले होते. जिनांमध्ये काही चांगल्या गोष्टी असतील; परंतु, ते आमच्यासाठी निरुपयोगी आहेत, असेही ते म्हणाले. एक वृत्तवाहिनीने राबविलेल्या कार्यक्रमात मदनी बोलत होते.

अखिलेश यादव यांनी जिना यांचे नाव का घेतले? त्याला उत्तर देताना मदनी म्हणाले की, मोठ्या अर्थाने सांगायचे तर हा मूर्खपणा आहे. जिना यांचा आमच्याशी काय संबंध? अखिलेश यादव हे स्वतंत्र राजकीय पक्षाचे नेते आहेत. कदाचित त्यांना त्यांच्याबद्दल काही आवडत असेल. परंतु, मुस्लिमांना का जोडले जात आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: लईच भारी! एकाच प्रभागात सख्ख्या जावा आमनेसामने; रंगतदार लढत

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मुस्लिमांची ही अवस्था का? यावर मौलाना म्हणाले की, मुस्लिमांनी कोणत्याही एका पक्षाला पराभव करण्यासाठी मतदान करू नये. जिंकवण्यासाठी केले तर चालेल. या देशात जेवढा क्रिमीलेयर होता तेवढा तो भारतीय मुस्लिम सोडून पाकिस्तानात गेला. गरीब लोक इथेच सोडले गेले. ७५ वर्षांत लोकांनी काय मिळवले हे लपवायची गरज नाही. या देशाने जे व्यासपीठ दिले त्याचे आभार मानले पाहिजे. या उपखंडातील मुस्लिमांपेक्षा भारतातील मुस्लिम कोणत्याही प्रकारे कमी नाहीत तर अधिक आहेत. काही पक्षांनी काही विशिष्ट हेतूने मुस्लिमांची बदनामी केली, असेही मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madani) म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top