''भाजपच्या रॅलीत सरकारी कर्मचारी अन् तिकीट मागणाऱ्यांची गर्दी''

आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष असून दुसऱ्या पक्षांप्रमाणे श्रीमंतांचा हा पक्ष नाहीये
Mayawati
Mayawati Team eSakal

लखनऊ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बसपाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर मायावती यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष गरीब जनतेचा पक्ष असून दुसऱ्या पक्षांप्रमाणे श्रीमंतांचा हा पक्ष नाहीये. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) निवडणुकांपूर्वी ज्या जाहीर सभा सध्या घेतल्या जात आहे, त्या जनतेच्या पैशांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या जोरावर घेतल्या जात असल्याचे सांगत त्यावर होणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

Mayawati
बॉर्डरवर भारत-पाक जवानांमध्ये गोडवा; एकमेकांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

आमच्या पक्षाने जर इतर पक्षांची कॉपी केली आणि एकामागून एक जाहीर सभा घेतल्या, तर माझी जनता त्याची किंमत उचलू शकणार नाही, असे सांगत मायावती म्हणाल्या की, निवडणुकीच्या बाबतीत आमच्या पक्षाची कार्यशैली वेगळी असल्याचे त्या म्हणाल्या. "जेव्हा काँग्रेस आणि भाजप सत्तेत असतात, मग ते केंद्रात असोत किंवा राज्यांमध्ये, ते निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी एकामागून एक जाहीर सभा घेतात. परंतु, जेव्हा हे पक्ष सत्तेत नसतात तेव्हा ते आपल्यासारखेच असतात. ते सार्वजनिक सभा घेत नाहीत, उद्घाटन समारंभांना उपस्थित राहत नाहीत किंवा पायाभरणी करत नाहीत. रॅलींमधील गर्दीबाबत मायावती म्हणाल्या की, यापैकी निम्मे सरकारी कर्मचारी आहेत आणि बाकीचे तिकीट मागणारे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Mayawati
पुलवामा हल्ला; पोलिस करणार मृत दहशतवाद्याची डीएनए चाचणी?

उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या (Uttar Pradesh Election) पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आणि नेतेमंडळी आपापला पक्ष मजबूत करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु बसपाच्या प्रमुख मायावती (Former CM Mayawati) अद्यापही मैदानात उतरलेल्या दिसत नसल्याचे म्हणत निवडणुका आल्या तरी त्या प्रचारासाठी बाहेर पडल्या नसून त्या पराभवाला घाबल्या आहेत, असे वक्तव्य शहा यांनी केले होते. यावर मायावती यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com