पुलवामा दहशतवादी हल्ला; पोलिस करणार मृत दहशतवाद्याची डीएनए चाचणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DNA test

पुलवामा हल्ला; पोलिस करणार मृत दहशतवाद्याची डीएनए चाचणी?

जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) एका दहशतवाद्याची डीएनए चाचणी करायची आहे. या मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा संबंध पुलवामा हल्ल्याशी (Terrorist attack in Pulwama) जोडला जात आहे. अनंतनाग चकमकीत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची डीएनए चाचणी केली (DNA testing of a dead terrorist) जाईल, असे जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख विजय कुमार यांनी शनिवारी सांगितले.

२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात (Terrorist attack in Pulwama) या दहशतवाद्याचा हात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. अनंतनाग चकमकीत मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचा चेहरा जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर समीर दार याच्याशी जुळत आहे. समीर दार हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शेवटचा जिवंत दहशतवादी असल्याचे म्हटले जात आहे. ३० डिसेंबर रोजी अनंतनागमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.

हेही वाचा: ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

डीएनए नमुन्याची चाचणी होत असल्याची माहिती आयजींनी ट्विटमध्ये दिली आहे. दक्षिण काश्मीरमधील नौगाम डोरू भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुलतान ऊर्फ ​​रेयास ऊर्फ ​​माविया (विदेशी दहशतवादी), निसार अहमद खांडे आणि अल्ताफ अहमद शाह अशी या तिघांची नावे आहेत. अल्ताफ अहमद हा नाथीपोरा डोरूचा रहिवासी आहे, तर निसार ददवांगन हा कापरानचा रहिवासी आहे.

शाह, सुलहान आणि दुसरा दहशतवादी सुहेल राथेर यांचाही श्रीनगरमधील जेवान येथील दहशतवादी हल्ल्यात (DNA testing of a dead terrorist) सहभाग होता. या हल्ल्यात तीन पोलिस शहीद झाले तर अकराहून अधिक जखमी झाले. पांथा चौकात सुहेलला वेगळ्या चकमकीत ठार करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Terrorist Attack In Pulwama Dna Testing Of A Dead Terrorist Jammu And Kashmir Police Crime Anantnag Flint

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top