esakal | UP Election 2021 | मायावती मैदानात, भाजप सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Sabha polls Mayawati says loss won not affect SP BSP ties terms BJP win in immoral says Mayavati

मायावती मैदानात... भाजप सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त

sakal_logo
By
ओमकार वाबळे

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रॅली काढली. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी रॅलीला संबोधित केलं. या दरम्यान मायावतींनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपच्या राजवटीत शेतकरी अडचणीत असल्याचं त्यांनी म्हटलं.

उत्तर प्रदेशात शेतकरी त्रस्त आहेत. कृषी कायद्यामुळे शेतक-यांमध्ये मोठा असंतोष आहे, असे त्या म्हणाल्या. आम्ही केलेल्या कार्याचे फक्त नामकरण करण्याचे काम समाजवादी पार्टी आणि भाजपने केले, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मायावतींची ही सभा महत्वाची मानली जात आहे. आत्ताही जास्तीत जास्त गर्दी गोळा करण्याची क्षमता आहे, हे मायावती दाखवून देण्याचा प्रयत्न करतील. सध्या उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यावर झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण आहे. सध्या मायावतींनी यामध्ये थेट उडी घेतली नसली, तरीही शेतकऱ्यांची बाजू मांडायला त्या पुढे सरसावतील. मायावती यांनी याआधीच दलित आणि ब्राह्मणांचं एकत्र समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

loading image
go to top