उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

पीटीआय
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी आम्ही सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशचे पूर्वांचलसह चार छोट्या राज्यांत विभाजन करू, अशी भूमिका मांडल्याने वातावरण पुन्हा तापले आहे.

उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा यामुळे पुन्हा चर्चेत आला असून, बसपने आम्ही पूर्वी दिलेली वचने पूर्ण करू असे म्हटले आहे. गोरखपूर येथे झालेल्या निवडणूक बैठकीत मायावती यांनी ही घोषणा केली आहे.

मायावती 2011 मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने उत्तर प्रदेश विधानसभेत विभाजनाचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्या वेळी पश्‍चिम उत्तर प्रदेशला हरित प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशला पूर्वांचल, बुंदेलखंड आणि अवध अशा चार भागांत उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याचे ठरले होते.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात विकास आणायचा असेल, तर त्याचे विभाजन करायला हवे, अशी भूमिका मायावतींनी मांडली होती. त्याच भूमिकेला पुढे नेत आता या वेळी तर उत्तर प्रदेशच्या जनतेने समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि भाजपला शिक्षा देत आम्हाला सत्तेवर आणावे, असे आव्हान केले आहे.

Web Title: mayawati endorses division of uttar pradesh