पुतळ्यांवर केलेला खर्च परत करा; मायावतींना न्यायालयाचा दणका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका दिला असून, मायावती यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करण्याचा आदेश आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका दिला असून, मायावती यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करण्याचा आदेश आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मायावतींनी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून लखनौ आणि नोएडामध्ये पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे पुतळे बांधले होते, हा जनतेच्या पैशाचा गैरवापर आहे. मुख्य न्यायधीश रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खंडपीठाने मायावतींच्या वकिल सतिश मिश्रांना सांगितले आहे की, मायावतींनी पुतळ्यावर केलेला खर्च सरकारी तिजोरीत जमा करावा.

एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या याचिकेत म्हटले होते की, तुम्ही पक्षाचा प्रपोगंडा चालवण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा वापरू शकत नाहीत, याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. मायावतींच्या वकीलांनी पुढची सुनवाई लोकसभा निवडणुका झाल्यानंतर म्हणजेच मेनंतर घ्यावी अशी मागणी केली परंतु, मुख्य न्याधीशांनी पुढील सुनवाई 2 एप्रिल रोजी होणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayawati Has To Reimburse Money Spent On Elephant Statues Says Top Court