Video : सुषमा स्वराज यांच्या पार्थिवजवळ ते ढसाढसा रडले...

वृत्तसंस्था
Wednesday, 7 August 2019

महाशय धर्मपाल गुलाटी हे भावूक झाले व नंतर त्यांना रडू कोसळले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री हृदय विकाराने निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाजवळ एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी हे भावूक झाले व नंतर त्यांना रडू कोसळले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सुषमा स्वराज यांचे पार्थिव आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालात ठेवण्यात आले होते. यावेळी अनेकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर भावूक झाले व त्यांना रडू कोसळले. कंपनीचे मालक अनेकदा जाहिरातीत ही दिसतात. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुषमा स्वराज यांची मंगळवारी (ता. 6) प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले होते, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज यांना पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी कौशल यांनी सॅल्यूट करत मानवंदना दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मंत्री रवीशंकर प्रसाद, मंत्री पियुष गोयल आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावाला खांदा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MDH owner Mahashay Dharampal Gulati cries inconsolably while paying tribute to Sushma Swaraj