कंगनाच्या फ्लाईटमध्ये माध्यमांकडून नियम धाब्यावर; इंडिगोने दिलं डीजीसीएला उत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 September 2020

कंगनाच्या Indigo फ्लाईटदरम्यान पत्रकारांनी विमानात गोंधळ घातल्याचे सोशल मीडियामधून समोर आले होते.

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) बुधवारी चंदीगडवरुन मुंबईत आली होती. यावेळी Indigo फ्लाईटदरम्यान पत्रकारांनी विमानात गोंधळ घातल्याचे सोशल मीडियामधून समोर आले होते. त्यानंतर विमान वाहतूक नियामकाने  Directorate General of Civil Aviation (DGCA) याप्रकरणी इंडिगोला उत्तर मागीतले होते. 

इंडिगोने यावर स्पष्टीकरण दिलं असून, याप्रकरणीचं उत्तर DGCA ला दिल्याचं म्हटलं आहे. आमचे कॅबिन क्यू, तसेच आमच्या कॅप्टनने आवश्यक ते सर्व प्रोटोकॉल पाळले आहेत. याशिवाय आम्ही वारंवार घोषणा करुन फोटो न काढण्यास, शारीरिक अंतर राखण्याचे आणि इतर सर्व सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन केले होते, असं इंडिगोने आपल्या जबाबात म्हटलं आहे.  

नवे शैक्षणिक धोरण हे भारताला नवी दिशा देणारे : PM मोदी

कंगनाच्या फ्लाईटदरम्यान माध्यमांच्या लोकांनी कोरोना संबंधीचे सर्व नियम धुडकावले होते. एकानेही शारीरिक अंतर पाळले नव्हते. शिवाय काही पत्रकारांनी मास्क न वापरल्याचंही दिसत होतं. DGCA ने फ्लाईट 6E-264 मधील माध्यमांच्या लोकांकडून सुरक्षा आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी रिपोर्ट मागितली होती. फ्लाईटमधील काही व्हिडिओ समोर आल्यानंतर DGCA हा निर्णय घेतला होता. 

कंगना रनौतची रिपोर्टिंग करण्यासाठी पत्राकार फ्लाईटमध्ये उपस्थित होते. ते आपल्या मोबाईलमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रिकॉर्ड करत होते. यावेळी अनेकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळले नव्हते. शिवाय फ्लाईटमधील सुरक्षा नियमही पाळले नव्हते. यासंबंधीचे व्हिडिओ बाहेर आल्याने माध्यमांवर टीका होत आहे. 

हद्दीत आलात तर बघून घेऊ; चीनला या छोट्या देशाची धमकी!

कंगना बुधवारी हिमाचलमधून चंदीगडला गेली, त्यानंतर तिने मुंबईसाठीची फ्लाईट घेतली. कंगना आणि महाराष्ट्रीत शिवसेना सरकारमध्ये वाद सुरु आहे. याच दिवशी बीएमसी कंगनाचे बांद्रा येथील पाली हिलमघील ऑफीस पाडत होती. बांधकाम अवैध असल्याचे कारण यासाठी देण्यात आलं होतं. बीएमसीची कारवाई आणि शिवसेनासोबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माध्यमे कंगणाच्या मुंबई प्रवासाची रिपोर्टींग करत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Media Creates Chaos On Kangana Ranaut Flight DGCA Seeks Report From IndiGo