माध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे. 

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये यंदा भारताला 138 वे स्थान मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत भारताच्या स्थानात दोन अंकांनी घसरण झाली आहे. 

या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानी असून उत्तर कोरिया तळाला गेला आहे. या निर्देशांकासाठी 180 देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. जगभरातील पत्रकार एकत्र येऊन हा निर्देशांक प्रसिद्ध करतात, 2002 सालापासून तो नियमितपणे प्रसिद्ध केला जात आहे. एखाद्या देशामध्ये पत्रकारांना कितपत स्वातंत्र्य आहे याचा तौलनिक अभ्यास करून या निर्देशांकामध्ये संबंधित देशाला स्थान दिले जाते. 

चांगली स्थिती 
समाधानकारक स्थिती 
दखलपात्र समस्या 
कठीण परिस्थिती 
अतिशय गंभीर स्थिती 

निवड झालेल्या 
देशांची क्रमवारी 

देश क्रमवारी 2017 पासूनच्या स्थितीतील फरक 
नॉर्वे 1 0 
स्वीडन 2 0 
नेदरलॅंड 3 +2 
फिनलॅंड 4 -1 
स्वित्झर्लंड 5 +2 
जर्मनी 15 +1 
दक्षिण आफ्रिका 28 +3 

फ्रान्स 33 +6 
ब्रिटन 40 0 
दक्षिण कोरिया 43 +20 
अमेरिका 45 -2 
जपान 67 +5 
ब्राझील 102 -2 
अफगणिस्तान 118 +2 

श्रीलंका 131 +10 
भारत 138 -2 
पाकिस्तान 139 0 
बांगलादेश 146 0 
रशिया 148 0 
तुर्कस्तान 157 -2 
इराण 164 +1 
सौदी अरेबिया 169 -1 
चीन 176 0 
उत्तर कोरिया 180 0


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Media Freedom India has back