New Delhi: पॅरिस ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या १२० खेळाडूंसाठी १३ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमची निवड

भारतीय केंद्रीय क्रीडा मंत्रालय, स्पोर्ट्‌स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) व भारतीय ऑलिंपिक संघटना यांनी एकत्र येऊन भारतीय खेळाडूंच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.
Paris 2024 Olympics date schedule know all details here
Paris 2024 Olympics date schedule know all details hereSakal

नवी दिल्ली ­: भारतीय केंद्रीय क्रीडा मंत्रालय, स्पोर्ट्‌स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) व भारतीय ऑलिंपिक संघटना यांनी एकत्र येऊन भारतीय खेळाडूंच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पॅरिस ऑलिंपिकसाठी निवडण्यात आलेल्या १२० खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक या दोन्ही बाबींवर विशेष लक्ष देण्यासाठी १३ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमची निवड करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज असलेले भारतीय खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे विश्‍वासाने सांगितले आहे.

दिनशॉ पारडीवाला या वेळी म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंच्या मागील दुखापतींबाबत मी काही बोलणार नाही. सध्या काही खेळाडूंना छोट्या दुखापती आहेत; पण त्या गंभीर नाहीत. क्रीडा मेडिसीन, क्रीडा पोषण व मानसिक अवस्था या तीन बाबींवर ध्यान देण्यात आले. राष्ट्रीय सराव शिबिरात आम्ही दाखल झालो.

डॉ. दिनशॉ पारडीवाला कोण?

डॉ. दिनशॉ पारडीवाला हे क्रीडा मेडिसनतज्ज्ञ आहेत. भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता, त्यावेळेस दिनशॉ यांनीच त्याच्यावर उपचार केले होते. पंतला पूर्णपणे तंदुरुस्त करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ऑलिंपिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्या दुखापतीवरही त्यांनीच उपचार केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com