१ एप्रिलपासून उपचार महागणार; ‘या’ औषधांच्या किमतीत वाढ

Medicine will be more expensive from April 1
Medicine will be more expensive from April 1Medicine will be more expensive from April 1
Updated on

नवी दिल्ली : सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकामधील (WPI) बदलानुसार औषध कंपन्यांना वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीने ८०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारपासून (१ एप्रिल) अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती (Medicine will be more expensive from April 1) वाढणार आहेत. (Medicine will be more expensive from April 1)

ज्या औषधांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत त्यांची अत्यावश्यक औषधे म्हणून गणना केली जाते. ती औषधांच्या राष्ट्रीय अत्यावश्यक यादीत (NLEM) येतात. ही औषधे प्रतिजैविक, सर्दी आणि खोकल्याची औषधे, दाहक-विरोधी औषधे, कान, नाक आणि घसा औषधे, जंतुनाशक, वेदनाशामक, गॅस औषधे आणि बुरशीविरोधी औषधे आहेत. ८०० हून अधिक औषधे आहेत. १ एप्रिलपासून या औषधांच्या किमती १०.७६ टक्क्यांनी वाढणार आहेत.

Medicine will be more expensive from April 1
सोनिया गांधींचा PM मोदींना टोमणा, म्हणाल्या...

आता तापासाठी सर्रास वापरला जाणारा पॅरासिटामॉलही महाग होईल. पॅरासिटामॉल आणि ॲझिथ्रोमायसीन यासारखी अँटिबायोटिक्स जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. किमती वाढणाऱ्या औषधांमध्ये फॉलिक ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारखी अँटी-ॲनिमिक प्रिस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहेत.

घाऊक महागाई हे प्रमुख कारण

औषधांच्या किमती वाढण्यामागे (Medicine will be more expensive from April 1) घाऊक महागाई हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. घाऊक महागाईवर आधारित घाऊक किंमत निर्देशांक एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २०२१ मध्ये १०.७६ टक्क्यांनी बदलला आहे. २०१९ मध्ये एनपीपीएने फार्मास्युटिकल कंपन्यांना किमती सुमारे दोन टक्क्यांनी वाढवण्याची परवानगी दिली होती. २०२० मध्ये किमती ०.५ टक्क्यांनी वाढवल्या होत्या. यंदा पहिल्यांदाच दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Medicine will be more expensive from April 1
दोन खुनांनी ‘मार्च एन्ड’; नागपुरात फेब्रुवारीत शून्य तर या महिन्यात ११ मर्डर

रुग्णांच्या खिशावर होणार परिणाम

औषधांच्या (Medicine) किमतीत वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना अधिकचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com