दोन खुनांनी ‘मार्च एन्ड’; नागपुरात फेब्रुवारीत शून्य तर या महिन्यात ११ मर्डर

Double Murder In Nagpur District
Double Murder In Nagpur DistrictDouble Murder In Nagpur District
Updated on

नागपूर : नागपूर शहराची क्राइम कॅपिटल अशी नवीन ओळख झाली आहे. रोज होणारे खून हे या मागील कारण आहे. खून, घरफोडी, अत्याचार हे नित्याचेच झाले आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात एकही खून झाला नव्हता. यामुळे शहरातील काईम संपले की काय, असाच प्रश्न विचारला जात होता. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. ३१) शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक खून (Murder) झाला. यामुळे मार्च महिन्यात खुनांची संख्या ११ झाली आहे. (Double Murder In Nagpur District)

प्राप्त माहितीनुसार, हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरस्वतीनगर येथे रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास संपत्तीच्या वादातून जावयाने साळ्याच्या डोक्यावर फावड्याने वार करीत खून केला. नितेश शंकर सोनवाने (२४, रा. सरस्वतीनगर) असे आरोपी जावयाचे नाव आहे. तो चायनिजचा ठेला चालवतो. तर जयकिशन शामराव जावणकर (२८, रा. सरस्वतीनगर) असे मृत साळ्याचे नाव आहे. तो कुठलाही कामधंदा करीत नव्हता.

Double Murder In Nagpur District
नितीन गडकरींच्या विधानानंतर लोकसभेत हशा पिकला; म्हणाले...

अनेक महिन्यांपासून जयकिशन आणि बहीण प्रिया नितेश सोनवाने (३२) यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. यातून दोघांचे नेहमीच खटके उडायचे. बहिणीने दुसरे लग्न केल्याने नितेश हा हरीनगर येथील घर सोडून १३ वर्षीय मुलीसह भावाच्या घरी वरच्या मजल्यावर राहायला आला. रात्री जयकिशन आणि बहीण प्रिया यांचे भांडण सुरू झाले. त्यामध्ये जावयाने उडी घेतली.

यावेळी जयकिशनने ‘हे माझे घर असून, ते खाली कर’ असे सांगितले. यामुळे नितेश चिडला. तोजयकिशनच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी तिथे उभा असलेल्या जयकिशनचा मित्र भावेश अजय भोंगे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागला. त्याला बाजूला करीत नितेशने फावडा उचलून जयकिशनच्या डोक्यावर मारला.

Double Murder In Nagpur District
सकाळी आजोबाचा मृत्यू अन् रात्री नातवाला बिबट्याने नेले उचलून

या हल्ल्यात जयकिशन गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण (Murder) पावला. नितेशच्या हातातून फावडा हिसकावून घेतल्याने भावेशला चावा घेत जखमी केले. यानंतर तो पळून गेला. भावेशने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीवर गुन्हा नोंदवीत काहीच वेळात अटक केली.

दुसऱ्या घटनेत हिंगण्यातील डोंगरगाव परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ आशिष जयलाल बिसेन (२६, रा. आंबेडकरनगर, वाडी) याची धारदार शस्त्राने वार करीत खून (Murder) करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता. ३१) सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निलेंद्र कपुरचंद बघेल (२५, रा. खापरी) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

Double Murder In Nagpur District
सोनिया गांधींचा PM मोदींना टोमणा, म्हणाल्या...

दोन्ही खून कौटुंबिक वादातून

दोन खुनांनी मार्च महिन्यात झालेल्या खुनांची संख्या ११ झाली आहे. हे खून हुडकेश्‍वर आणि हिंगणा परिसरात झाले. कौटुंबिक वादातून (Family disputes) दोन्ही खून झाल्याची माहिती आहे. दोन्ही खुनातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com