सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, शाळेच्या वॉशरूममध्ये आढळला मृतदेह

Meerut Student Dies of Heart Attack उत्तर प्रदेशातील मेरठ इथं सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. त्याचा मृतदेह शाळेच्या वॉशरूममध्ये आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
Meerut Student Dies of Heart Attack

Meerut Student Dies of Heart Attack

Esakal

Updated on

एका १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शाळेच्या वॉशरूममध्येच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तो जागीच कोसळला. शाळा सुटल्यानंतर गेटवर त्याला नेण्यासाठी रिक्षा आली पण तो बराच वेळ न आल्यानं चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालायत नेण्यात आलं पण उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com