Court
sakal
कोर्टाच्या आदेशानंतरही कार्यवाही न केल्यानं पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने एससीपीला फटकारलं. तसंच आदेशाचे उल्लंघन केल्यानं कोर्टात सुनावणी संपेपर्यंत उभा राहण्याची शिक्षा दिली. उत्तर प्रदेशातील एका प्रकरणी सुनावणीसाठी इलाहाबाद हायकोर्टानं पोलिसांना आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या सुनावनीला आरोपीला कोर्टात हजर केलं नाही. आदेश न पाळल्यानं कोर्टाने एसएसपीला दुपारी चार वाजेपर्यंत कोर्टरूममध्ये उभं राहण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रकरणात मेरठच्या मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही कोर्टाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.