Employee : जा जी ले अपनी जिंदगी! ई-कॉमर्स कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास घोषणा

सणासुदीच्या हंगामानंतर कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
Employee
EmployeeSakal

Meesho Big Announcement For Employee : किती आनंद होतो, जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगते... जा जगा तुमचे आयुष्य. अशाच प्रकारची एक घोषणा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. कर्मचारी आनंदी असतील तर, त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील, असा विश्वास मीशोला असून, कर्मचारी खूश असतील तर, ते चांगल्या प्रकारे मेहनत करू शकतील असे मिशोचे मत आहे. ही बाब लक्षात घेत कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

कंपनीची घोषणा काय?

मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी 11 दिवसांसाठी 'रीसेट आणि रिचार्ज ब्रेक'ची घोषणा केली आहे. मीशोने आपल्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांना मानसिक थकवा दूर करणे हा या सुट्यांमागील मुख्य उद्देश असल्याचे कंपनीचे म्हटले आहे. सणासुदीच्या हंगामानंतर कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत दिल्या जाणार आहेत.

Employee
NIA Raids On PFI : शाहांच्या बैठकीत आखण्यात आली PFI वर 'सर्जिकल स्ट्राइक'ची स्क्रिप्ट

रीसेट आणि रिचार्जसाठी ब्रेक

याबाबत कंपनीचे संस्थापक आणि सीटीओ संजीव बरनवाल यांनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले की, कंपनीचे प्राथमिक उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. आगामी सणांनंतर मीशोचे कर्मचारी 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या सुट्ट्यांचा उपयोग त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी करू शकतील असे बरनवाल यांनी स्पष्ट केले आहे. कर्मचारी या सुट्ट्यांचा उपयोग कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी, फिरण्यासाठी करू शकतात.

Employee
Shivsena : चर्चा तर होणारच! सेनेचा दसरा मेळावा अडचणीत; हे पर्याय अवलंबणार?

बरनवाल यांच्या ट्वीटशिवाय मीशोचे संस्थापक आणि सीईओ विदित अत्रे यांनीही याबद्दल ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अंतराळवीरांनाही ब्रेकची आवश्यकता असते. तसेच कंपनीमध्ये 'मूनशॉट मिशनवर काम करणाऱ्या लोकांनाही आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी मीशोने अनंत कल्याण अंतर्गत पॅरेंटल लिव्हसाठी 30 आठवड्यांची सुट्टी जाहीर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com