
पंतप्रधान मोदींच्या लेखातला बालपणीचा मित्र 'अब्बास' कोण? जाणून घ्या...
आई हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये त्यांनी आपल्या लहानपणीच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. त्यामध्ये त्यांचा लहानपणीचा मित्र अब्बास याचाही उल्लेख केला होता. याच अब्बासबद्दल सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. कोण आहे हा अब्बास? (Who is PM Modi's friend Abbas mentioned in his blog)
या अब्बासबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भावाने माहिती दिली आहे. अब्बास सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. अब्बास गुजरात सरकारसाठी क्लास २ कर्मचारी म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच तो निवृत्त झाला आहे. तो अन्न आणि पुरवठा विभागात कार्यरत होता.
अब्बासला दोन मुलेही आहेत. मोठा मुलगा गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातल्या खेरलू भागात राहतो, तर लहान मुलगा ऑस्ट्रेलियाला राहतो. अब्बास सध्या सिडनीमध्ये राहणाऱ्या लहान मुलाकडे राहत आहे.
हेही वाचा: Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई झाल्या १०० वर्षांच्या | मोदींनी घेतले आशिर्वाद
आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi's mother's 100th Birthday) लिहिलेल्या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. या लेखात ते म्हणतात की आमच्या घरापासून थोड्याशा लांब अंतरावर एक गाव होतं. जिथं माझ्या वडिलांचे जवळचे मित्र राहायचे. त्यांचा अब्बास नावाचा मुलगा होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आमच्या वडिलांनी अब्बासला आमच्या घरी आणलं. अब्बास आमच्याच घरी राहिला आणि शिकला. आम्हा सर्व भावंडांप्रमाणेच आईने अब्बासलाही सांभाळलं. ईदच्या दिवशी आई अब्बासच्या आवडीचे पदार्थही बनवायची.
Web Title: Meet Abbas The Childhood Friend Pm Modi Mentioned In His Blog
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..