ज्ञानवापी-टीपू सुलतान मशिद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बोर्डाची तातडीची बैठक I Muslim Board | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

All India Muslim Personal Law Board

कर्नाटकच्या श्रीरंगपट्टन येथील जामा मशिदीचा वाद उफळू लागलाय.

ज्ञानवापी-टीपू सुलतान मशिद प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बोर्डाची तातडीची बैठक

गेल्या काही दिवसांपासून बनारसमधील (वाराणसी) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून (Gyanvapi Masjid Survey) देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सोमवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आलाय. तर, दुसरीकडं सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण झालं नसल्याचं सांगितलंय.

दरम्यान, एकीकडं ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू असतानाच आता कर्नाटकातील टीपू सुलतान कालीन मशिदीवरही (Tipu Sultan) हिंदुत्ववादी गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय. 1782 मध्ये टीपू सुलताननं हनुमान मंदिर पाडून मंड्या येथील श्रीरंगपट्टन इथं जामा मशीद बांधली होती, असा दावा हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आलाय. त्यामुळं संबंधित मशीद आमच्या ताब्यात द्यावी, तसेच मशिदीत पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्नाटकातील नरेंद्र मोदी विचार मंचाकडून (Narendra Modi Vichar Manch) करण्यात आलीय.

हेही वाचा: नेपाळ : भारताचे नवे राजदूत म्हणून नवीन श्रीवास्तवांची नियुक्ती

ज्ञानवापीनंतर आता कर्नाटकच्या श्रीरंगपट्टन (Karnataka Srirangapatna) येथील जामा मशिदीचा वाद उफळू लागलाय. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं (All India Muslim Personal Law Board) आज 17 मे रोजी आपल्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलावली होती. संबंधित बैठकीत ज्ञानवापी मशीद, टिपू सुलतान मशीद यासह देशातील सध्याच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Meeting Convened By Muslim Board On The Background Of Gyanvapi Tipu Sultan Masjid Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top