
व्याघ्र गणनेच्या दृष्टीने मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नागपुरात १७ किंवा १८ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
नागपूर : व्याघ्र तस्करीचे मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या चीन नजीक असणाऱ्या व्हिएतनाम, लाओ पीडीआर व कंबोडिया या तीन देशातून मागील १० वर्षांत वाघ जवळपास लुप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील ७५ टक्के वाघ असणाऱ्या भारतात व्याघ्र संवर्धनाचे मोठे काम आहे. 2022 च्या व्याघ्र गणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया यंदा ऑक्टोबरपासून देशभरातील सर्वच जंगलात सुरू होणार आहे. २६ हजार ७६० स्थानावर गणना होणार असून साडेतीन कोटीपेक्षा अधिक छायाचित्र घेतली आहेत. या गणनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. व्याघ्र गणनेच्या दृष्टीने मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पाच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नागपुरात १७ किंवा १८ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे
देशातील वाघांचे वास्तव्य असलेल्या राज्यांमध्ये दर चार वर्षांनी होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना २०२२ मध्ये होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सर्व राज्यांच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (वन्यजीव) तयारी करा आणि अर्थसंकल्पात व्याघ्र गणनेसाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरातील व्याघ्र गणना २० राज्यांतील जंगलात 'लाइन ट्रॅन्झॅक्ट मेथड' (रेषा विभाजन पद्धत) वापरण्यात येणार आहे. वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेप आदींची माहिती मिळविण्यावर यात भर दिला जाणार आहे. यापूर्वीची व्याघ्र गणना २०१८ साली झाली होती.
हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का? वाचा स्पेशल...
डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धतीने २००६ मध्ये प्रथमच देशभरात व्याघ्रगणना करण्यात आली होती. पुढील वर्षी देखील त्याच पद्धतीने व्याघ्र गणनेची मोहीम राबविली जाणार आहे. देशभरात २०१८ च्या व्याघ्र गणनेनुसार २ हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे. एकेकाळी देशात संकटग्रस्त ठरू पाहणारी वाघांची प्रजाती आणि आता वाढत असलेली वाघांची संख्या, हे आशादायी चित्र २०१८च्या व्याघ्रगणनेत दिसून आले. २०२२च्या व्याघ्र गणनेसाठी देशभरात राबविण्यात येणाऱ्या वेळापत्रकावर काम सुरू आहे. देशभरात २० राज्यांत प्रत्यक्ष व्याघ्रगणना सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
हेही वाचा - मुला-मुलीचं लग्नही पाहता आलं नाही; पोट भरण्यासाठी जंगलात गेला अन् घरच्यांनी फोडला एकच हंबरडा
देशाची स्थिती -
वर्ष | वाघांची संख्या |
२००६ | १ हजार ४११ |
२०१० | १ हजार ७०६ |
२०१४ | २ हजार २२६ |
२०१८ | २ हजार २६७ |
राज्याची स्थिती -
वर्ष | वाघांची संख्या |
२००६ | १०३ |
२०१० | १६९ |
२०१४ | १९० |
२०१८ | ३१२ |
२०२२ मध्ये होणाऱ्या व्याघ्र गणनेच्या तयारीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, तसेच कॅमेरा ट्रॅप आदी खरेदी करण्याचे नियोजन करा अशा सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या आहेत. त्यानुसार तयारी सुरू केलेली आहे.
-नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)