Milk Institute : देशात ७५ हजार दूध संस्था स्थापणार

सहकाराच्या माध्यमातून देशात ‘श्वेत क्रांती २.०’ द्वारे दुग्ध क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले जाणार आहे.
milk institute

milk institute

sakal

Updated on

सहकाराच्या माध्यमातून देशात ‘श्वेत क्रांती २.०’ द्वारे दुग्ध क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले जाणार आहे. यादृष्टीने देशभरात ७५ हजार नव्या बहुउद्देशीय सहकारी दुग्ध संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. तर महाराष्ट्रात २०२९ पर्यंत सुमारे अडीच हजार नव्या दूध सहकारी समित्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सीमा द्विवेदी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com