MP Ricky AJ Syngkon Passed Away : ज्येष्ठ खासदार फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन; राज्यावर शोककळा

Meghalaya MP Death : प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मावईंग कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले.पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Meghalaya MP Ricky AJ Syngkon collapsed on the football field in Mawlai Mawïong, Shillong, after suffering a sudden heart attack.

Meghalaya MP Ricky AJ Syngkon collapsed on the football field in Mawlai Mawïong, Shillong, after suffering a sudden heart attack.

esakal

Updated on

देशात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या अनेक बातम्या दररोज समोर येत असतात. कोणाचे नाचताना, तर कोणाचे बसल्या जागी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मेघालयातून देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. शिलाँगचे खासदार रिकी ए.जे. सिंगकॉन यांची गुरुवारी मावलाई मावईंग येथे फुटबॉल खेळताना प्रकृती बिघडली आणि त्यांचा मैदानावरच मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की, व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) चे नेते ५४ वर्षीय रिकी ए.जे. सिंगकॉन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com