Meghalaya Political Crisis : मेघालयात काँग्रेसचे वाजले ‘बारा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meghalaya Political Crisis
मेघालयात काँग्रेसचे वाजले ‘बारा’

Meghalaya Political Crisis : मेघालयात काँग्रेसचे वाजले ‘बारा’

शिलाँग/नवी दिल्ली : काँग्रेसला आणखी एका राज्यात अंतर्गत संघर्षाचा धक्का बसला आहे. मेघालयमध्ये १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घडामोड घडली.

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

मेघालयमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पक्षांतर केलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचा समावेश आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. ऑगस्टमध्ये प्रदेशाध्यक्षपदी व्हिन्सेंट एच. पाला यांची नियुक्ती झाल्यापासून संगमा नाराज होते. आपल्या परवानगीशिवाय ही नियुक्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता. पाला यांच्या सत्कार समारंभाकडे त्यांनी पाठ फिरविली होती. त्यानंतर दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

प्रशांत किशोर यांची भेट

संगमा अलीकडेच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना भेटले होते. त्याबाबत संगमा यांनी सांगितले की, मी त्यांना भेटलो तेव्हा एका मित्राशी संवाद साधल्यासारखे वाटले. आम्हा दोघांची उद्दीष्टे समान असल्याची जाणीव झाली. त्यांच्याबरोबरील चर्चेनंतर तृणमूलच्या क्षमतेविषयी माझ्या मनात विश्वास निर्माण झाला.

loading image
go to top