Exit Polls 2023: 'या' राज्यांमध्ये ही भाजपचा डंका; एक्झिट पोल आले समोर

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा कसा झाला परिणाम
Meghalaya-Tripura-Nagaland Exit Polls 2023
Meghalaya-Tripura-Nagaland Exit Polls 2023esakal

Meghalaya-Tripura-Nagaland Exit Polls 2023: मेघालय आणि नागालँडमध्ये सोमवारी (27 फेब्रुवारी) मतदान संपल्याने तिन्ही राज्यांतील निवडणुकांचा जल्लोष संपुष्टात आला आहे. यापूर्वी 16 फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये मतदान झाले होते.

तिन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. आता 2 मार्चला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणूक निकालापूर्वी तीन राज्यांचे एक्झिट काय सांगतोय पाहा.

या एक्झिट पोलमधून जाणून घ्या, कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळू शकतात. सोमवारी मेघालयातील 3,419 मतदान केंद्रांवर मतदान झाले.

नागालँडमधील 60 पैकी 59 विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या एकाच टप्प्यात सुमारे 88 टक्के मतदान झाले.

नागालँड एक्झिट पोल

झी न्यूज-मॅट्रिझच्या एक्झिट पोलने नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीला 35-43 जागांसह मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसला सुमारे एक ते तीन जागा आणि एनपीएफला दोन ते पाच जागा मिळू शकतात.

दुसरीकडे, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागालँडमधील 60 जागांपैकी भाजप-एनडीपीपी युतीला 38-48 जागा मिळू शकतात. एनपीएफला 3-8 जागा, काँग्रेसला 1-2 जागा आणि इतरांना 5-15 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

एक्झिट पोलनुसार भाजप-एनडीपीपी युतीला 49 टक्के मते मिळत आहेत. एनपीएफला 13 टक्के, काँग्रेसला 10 टक्के आणि इतरांना 28 टक्के मते मिळत आहेत.

टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलनुसार, भाजपा-एनडीपीपीला 39-49 जागा, एनपीएफला 4-8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. जन की बातनुसार, भाजप-एनडीपीपी युतीला 35-45 जागा, एनपीएफला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एकही जागा दिसत नाही.

त्रिपुरा एक्झिट पोल

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये 60 जागांपैकी भाजपला 36-45 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

टीएमपीला 9-16 जागा मिळताना दिसत आहेत. डाव्या पक्षांना 6-11 जागा दिसत नाहीत आणि इतरांना एकही जागा मिळत नाही. आणि झी न्यूज-मॅट्रिझ एक्झिट पोलने त्रिपुरामध्ये भाजपला 29 ते 36 जागांसह पुनरागमनाचा अंदाज वर्तवला आहे.

एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला ४५ टक्के मते मिळल्याची शक्यता आहे. डाव्या + काँग्रेसला 32 टक्के, टिपरा मोथा + 20 टक्के आणि इतरांना 3 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स नाऊ ईटीजी एक्झिट पोलनुसार, भाजपला 21-27 जागा मिळतील, डाव्यांना 18-24 जागा मिळतील. जन की बातनुसार, भाजपला 29-40 जागा मिळतील, तर डाव्यांना 9-16 जागा मिळतील.

मेघालय एक्झिट पोल

झी न्यूज-मॅट्रिझ एक्झिट पोलमध्ये एनपीपीला 21-26 जागा, भाजपला 6-11 जागा, टीएमसीला 8-13 जागा, काँग्रेसला 3-6 जागा आणि इतरांना 10-19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एनपीपीला 18-24 जागा, भाजपला 4-8 जागा, काँग्रेसला 6-12 जागा, टीएमसीला 5-9 जागा आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोलनुसार, एनपीपीला 29 टक्के, काँग्रेसला 19 टक्के, भाजपला 14, टीएमसीला 16 आणि इतरांना 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जन की बातनुसार, एनपीपीला 11-16 जागा, भाजपला 3-7 जागा, काँग्रेसला 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com