
Mehbooba Mufti
Sakal
श्रीनगर : भाजपचे लोक काश्मीरमध्ये लोकांना बळजबरीने म्हणजे बंदुकीच्या धाकावर राष्ट्रगीतासाठी उभे करत आहेत, असा गंभीर आरोप पीडीपीच्या अध्यक्षा व माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला. ३० सप्टेंबर रोजी श्रीनगरच्या टीआरसी ग्राउंड येथे पोलिस हुतात्मा फुटबॉल स्पर्धेदरम्यान (मुश्ताक मेमोरियल करंडक) अंतिम सामन्यावेळी राष्ट्रगीत होताना काही जण उभे राहिले नव्हते. याप्रकरणी पंधरापेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.