
पदावरुन हटताच माजी राष्ट्रपतींवर मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा, म्हणाल्या...
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. आज देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. 24 जुलै रोजी रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द संपुष्टात आली. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कोविंद यांच्यावर निशाणा साधला.(Mehbooba Mufti attack on former president ramnath kovind)
हेही वाचा: फुलन देवीवर होते मुलायम सिंह यादव यांचे उपकार
मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट करत रामनाथ कोविंद यांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'आर्टिकल 370 असो किंवा नागरिकत्व (CAA) कायदा असो किंवा अल्पसंख्यांक, दलितांना टार्गेट करणं असतो. त्यांनी भारतीय संविधानाच्या नावावर भाजपाचा राजकीय अजेंडा पूर्ण केला. ' असा आरोप मुफ्तींनी कोविंद यांच्यावर केला आहे.
यापूर्वी मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हर घर तिरंगा अभियानावरून टीकास्त्र सोडले होते. ‘ आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सादरा करतो. कारण आम्ही स्वतंत्र झालो आहोत. एक देश आहोत. जम्मू काश्मीर हे एक मुस्लिम राज्य असूनही आम्ही पाकिस्तानसोबत गेलो नाहीत. आम्ही सेक्युलरिझमसाठी भारताचा झेंडा स्वीकारला. पण आज हे लोक प्रत्येक घरात घुसून झेंडा लावत आहेत. खरं तर हे लोक भगवा झेंडा मानणारे आहेत. तिरंग्याचा आदर नसणारे लोक आमच्या घरात घुसून झेंडे लावत आहेत, असा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
हेही वाचा: अब्जाधिशांनाही 'पारले-जी'ची भुरळ; इंडिगोच्या एमडींनी विमानप्रवासात घेतला आस्वाद
हर घर तिरंगा अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादीचा अमृत महोत्सव अर्तंगत सर्व नागरिकांना 13 ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याटे आवाहन केले आहे. हर घर तिरंगा असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. भारत सरकारच्या या अभियानाअंतर्गत देशातील 20 कोटी लोकांच्या घरावर तिरंगा फडकवला जाईल.
Web Title: Mehbooba Mufti Attack On Former President Ramnath Kovind
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..