अब्जाधिशांनाही 'पारले-जी"ची भुरळ; इंडिगोच्या एमडींनी विमानप्रवासात घेतला आस्वाद | On IndiGo flight MD Rahul Bhatia's tea with Parle G biscuits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On IndiGo flight MD Rahul Bhatia's tea with Parle G biscuits

अब्जाधिशांनाही 'पारले-जी'ची भुरळ; इंडिगोच्या एमडींनी विमानप्रवासात घेतला आस्वाद

पारले-जी हे भारतातील सर्वात जास्त विकले जाणारे बिस्कीट आहे. भारतात तुम्हाला एकंही असं घर आढळणार नाही, जिथं पारले-जी आणलं गेलं नसेल. अनेकांची तर सकाळ पारले-जी सोबत होते. सध्या एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये करोडपती व्यक्ती 5 रुपयाचे पार्ले-जी बिस्किट आणि चहा पिताना दिसत आहे.(On IndiGo flight MD Rahul Bhatia's tea with Parle G biscuits)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, इंडिगो एअरलाइन्सचे सह-संस्थापक आणि एमडी राहुल भाटिया चहासोबत पार्ले-जीचा आनंद घेताना दिसत आहेत. ५ रुपयाचे पार्ले-जी खाते असलेल्या या प्रसिद्ध उद्योगपतीला पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाटिया चहात बुडवत पार्ले-जी बिस्किट खात आहेत, त्यांच्या समोरच्या टेबलावर पार्ले-जी बिस्किटांचे ५ रुपये किमतीचे छोटे पॅकेट आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: National Flag: तिरंग्या आधीचे ‘हे’ पाच राष्ट्रध्वज तुम्हाला माहिती आहेत का ?

हेही वाचा: Draupadi Murmu यांनी शपथविधीवेळी का परिधान केली संथाली साडी? जाणून घ्या...

पारले-जी बिस्किटचा इतिहास

पारले-जी 82 वर्ष जुना ब्रँड आहे. याची सुरुवात मुंबईतील विले-पार्ले भागातील एका बंद पडलेल्या जुन्या कारखान्यातून झाली. 1929मध्ये मोहनलाल द्याल नावाच्या एका व्यापाऱ्यानं हा कारखाना विकत घेतला. तिथं त्यांनी कन्फेक्शनरी बनवण्याचं काम सुरू केलं. भारताच्या या पहिल्या कन्फेक्शनरी ब्रँडचं नाव त्या ठिकाणावरून पडलं. हा कारखाना सुरू झाला तेव्हा तिथं केवळ घरातील लोकच काम करत होती.

कारखाना सुरू झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1939 साली इथं बिस्किट बनवण्याचं काम सुरू झालं. त्याच वर्षी या बिझनेसला अधिकृत नाव देण्यात आलं. पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने इथं बिस्किट बनू लागले. कमी किंमत आणि चांगल्या क्वालिटीमुळे अल्पावधीतच ही कंपनी लोकप्रिय झाली. त्यावेळी या पारले बिस्किटचं नाव पारले ग्लुको होतं.

Web Title: On Indigo Flight Md Rahul Bhatias Tea With Parle G Biscuits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..