मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; लॉक गेट अन् CRPF वाहनाचे फोटो केले पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; लॉक गेट अन् CRPF वाहनाचे फोटो केले पोस्ट

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत; लॉक गेट अन् CRPF वाहनाचे फोटो केले पोस्ट

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी दावा केला की, काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखण्यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भट यांची नुकतीच शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

मुफ्ती यांनी गुपकर भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या बंद दरवाज्याबाहेर पार्क केलेल्या सीआरपीएफच्या वाहनाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. माजी मुख्यमंत्री म्हणाल्या की, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. काश्मिरी पंडितांच्या दुरवस्थेकडे केंद्र सरकार लक्ष घालू इच्छित नाही.

हेही वाचा: भाजपचा चोर दरवाजाने निवडणुका जिंकण्याचा मानस; मेहबुबा मुफ्तींचा हल्लाबोल

चुकीच्या धोरणांमुळेच त्या लोकांच्या दुर्दैवी टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. यासाठी सरकार आपल्याला सर्वांसमोर काश्मिरी पंडितांचे शत्रू म्हणून दाखवत आहे. म्हणूनच आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

छोटीगाम येथील भट कुटुंबाला भेटण्याचा त्यांचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला, असे मुफ्ती यांनी संदेशात म्हटले आहे. प्रशासनाचा दावा आहे की आम्हाला कुलूपबंद करणे हे आमच्या सुरक्षेसाठी आहे.

Web Title: Mehbooba Mufti Claims She Been Placed Under House Arrest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..