
श्रीनगर : पहलगाम हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही एखाद्या कारवाईसारखी राबविली जात असल्याचा आरोप पीडीपीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला. यासंदर्भात त्यांनी नायब उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार काश्मीर खोऱ्यातील अनेकांना अटक केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.