
"Former J&K Chief Minister Mehbooba Mufti addressing media on Gen-Z rise in Ladakh and POK politics."
esakal
Rising Influence of Gen-Z in Ladakh and POK : लडाखमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. निदर्शकांनी पोलिसांचे वाहन पेटवले आणि अनेक ठिकाणी तोडफोड केली. परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असताना, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.
मुफ्ती म्हणाल्या आहेत की उत्तराखंड, लडाख आणि पीओकेमधील जनरेशन झेडने अर्थात जेन झी यांनी त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि प्रशासनावरील त्यांचा विश्वास नष्ट करणाऱ्या व्यवस्थागत अपयशांविरुद्ध उठण्यास सुरुवात केली आहे.
मुफ्ती यांनी एक्स वर लिहिले की, उत्तराखंडपासून लडाखपर्यंत आणि सीमेपलीकडे काश्मीरमध्ये जनरेशन झेड उदयास येत आहे, कारण जेव्हा तुमचे भविष्य अंधकारमय दिसते आणि तुमची स्वप्ने चकनाचूर होतात तेव्हा प्रतिकाराला सीमा नसते.
तसेच, हे ते तरुण आहेत ज्यांनी भविष्यासाठी कठोर परिश्रम केले, कष्ट केले, प्रत्येक नियमाचे पालन केले आणि आशेचा किरण पकडून धरला. पण आता त्यांना त्यांचे भविष्य हातून निसटताना दिसत आहे. त्यामुळे ते फक्त निषेध करत नाहीत, तर ते सत्तेचा सामना सत्याने करत आहेत. कारण ज्या व्यवस्थेवर त्यांना विश्वास ठेवण्यास सांगितले गेले होते त्यांनी त्यांना खूप निराश केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.