Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

Pune Police send Notice to Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने, घडलेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता.
Police serve notice to Gautami Patil in connection with Vadgaon Budruk accident case in Pune.

Police serve notice to Gautami Patil in connection with Vadgaon Budruk accident case in Pune.

esakal

Updated on

Gautami Patil Receives Police Notice in Pune Accident Case : गौतमी पाटील बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे घडलेल्या अपघात प्रकरणात आता गौतमी पाटीलला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्याने, घडलेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला होता.

तर वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने चौकशी करण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी बजावली गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.  सामाजी विठ्ठल मरगळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

Police serve notice to Gautami Patil in connection with Vadgaon Budruk accident case in Pune.
Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

तर या अपघातानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे. दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या अपघात प्रकरणी आता गौतमी पाटीलला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे, असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Police serve notice to Gautami Patil in connection with Vadgaon Budruk accident case in Pune.
Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

तर दुसरीकडे  गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे तपास योग्यरित्या होत नसल्याचा आरोप या अपघातामधील जखमी झालेल्या रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित रिक्षा चालकावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढंच नाहीतर जखमी रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी असाही आरोप केला आहे की, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीही बदलला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com