Mehbooba Mufti : काश्मिरी पंडितांना विशेष मदत द्या; मेहबूबा यांची नायब राज्यपालांकडे मागणी
Jammu Kashmir Politics : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी नायब राज्यपालांची भेट घेऊन कैद्यांच्या सुटकेसह काश्मिरी पंडितांना जमीन, मदत व राजकीय समर्थन देण्याची मागणी केली. कलम ३७० हटवल्यानंतरची त्यांची ही पहिलीच अधिकृत भेट होती.
श्रीनगर : पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी (ता.१) नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन काश्मिरी पंडितांना विशेष मदत जाहीर करण्याची मागणी केली.