

Mercedes Crash Sparks Major Police Action
Esakal
केरळमध्ये मर्सिडीज हिट अँड रन प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव मर्सिडीज चालवत एका दुचाकीला धडक दिली होती. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला. या आरोपांनंतर आणि आंदोलनानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. तर कोच्ची शहर पोलीस आयुक्त कालीराज महेश यांची उचलबांगडी करण्यात आलीय.