
हुंड्यासाठी छळ करून पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली लखनऊमधील मर्चंट नेव्हीचा ऑफिसर अनुराग सिंहला अटक करण्यात आलीय. बुधवारी अनुराग सिंहला अटक केली असून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय. मधु सिंह हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्या वडिलांनी अनुराग सिंहवर हुंड्यासाठी छळ आणि गर्भपात करायला लावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता.