निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपी मुकेश सिंहची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था
Wednesday, 29 January 2020

न्यायाधीश आर. भानुमती, अशोक भूषण आणि एस. ए. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला.

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह यांने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेली दयेची याचना फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटीव्ह याचिकाही फेटाळण्यात आली आहे. आज (ता. 29) सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. न्यायाधीश आर. भानुमती, अशोक भूषण आणि एस. ए. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय सुनावताना सांगितले की, 'राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या दया याचिकेची आम्ही पडताळणी केली. गृहमंत्रालयाने या संबंधीची सगळी कागदपत्रे राष्ट्रपतींकडे दिली होती. मुकेश सिंहने केलेल्या दया याचिकेत कोणत्याही प्रकारचे तथ्य आढळले नाही. त्याला कोणताही आधार नाही. त्यामुळे ही याचिका फेटाळत आहोत.'

#BoycottIndigo अर्णब गोस्वामींचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या कुणालला इंडिगोनं केलं बॅन

मुकेश सिंहने त्याच्यासोबत जेलमध्ये अत्याचार होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, अशा कोणत्याही बाबींमुळे फाशी थांबू शकत नाही. हा याचिकेचा आधार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. 

6 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीतील तरूणीवर सहा जाणांनी पाशवी बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला होती. जीवनाशी झंज देऊन उपचाराअंती तिचा मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mercy petition submit by accused Mukesh singh rejected by supreme court