
कोरोनाच्या काळात अनेक प्रकारचे खोटे मेसेजेस, अफवा पसरवण्यात आल्या. अजुनही अशा प्रकारचे मेसेज सेंड केले जात आहे. आताही अशाच एक मेसेज व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम आता शिथिल झाले आहेत. कोरोनाच्या काळात अनेक प्रकारचे खोटे मेसेजेस, अफवा पसरवण्यात आल्या. अजुनही अशा प्रकारचे मेसेज सेंड केले जात आहे. आताही अशाच एक मेसेज व्हायरल होत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने तत्काळ शाळा आणि कॉलेज बंद करण्यात याव्यात असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. तसंच त्यासोबत काही न्यूज चॅनेल्सचे स्क्रीनशॉटही जोडण्यात आले आहेत. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
हे वाचा - कसली देशभक्ती? जिथं TRP आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी केला शहीद जवानांचा वापर
केंद्र सरकारने यावर उत्तर दिलं असून अशा प्रकारचे कोणतेही आदेश गृह मंत्रालयाने दिलेले नाहीत असं सांगितलं आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने म्हटलं आहे की, सोशल मीडियावरून करण्यात आलेला दावा खोटा आहे. व्हायरल करण्यात आलेले फोटो खोटे आहेत.
दावा:- कुछ #Morphed तस्वीरों में दावा किया जा रहा है कि गृह मंत्रालय ने स्कूल-कॉलेजों को फिर से बंद करने का आदेश जारी कर दिया है।#PIBFactCheck:- यह दावा फर्जी है। गृह मंत्रालय ने स्कूल-कॉलेजों को बंद करने से संबंधित ऐसा कोई आदेश जारी नहीं किया है। pic.twitter.com/NjBreaMNIy
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 18, 2021
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये ही जवळपास सात महिने बंद होते. राज्य सरकारने परिस्थितीनुसार शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. यातही कोरोनाचे प्रोटोकॉल पाळूनच शाळा उघडाव्यात असेही सरकारने सांगितले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, सॅनिटायझरचा वापर करणं या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. तसंच विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासचा पर्यायसुद्धा उपलब्ध असेल. पालकांनी परवानगी दिली तरच विद्यार्थ्याला शाळेत जाता येणार आहे.