
नवी दिल्ली : देशातील सार्वत्रिक निवडणुकीबाबत ‘मेटा’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या वादग्रस्त विधानावर भारत सरकारकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर कंपनीने या प्रकरणी माफी मागितली आहे. ही चूक अनवधानाने झाली असल्याची सारवासारव कंपनीच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आली.